ऑनलाईन टीम / कासा :
डहाणू तालुक्यातील कसा येथील उपजिल्हा रुग्णालयातून 24 कोरोना संशयितांनी पलायन केले आहे. रुग्णालय प्रशासनाने कासा पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हे संपूर्ण रुग्णालय सील करण्यात आले. या कोरोनाग्रस्त डॉक्टरांच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील इतर डॉक्टर्स, नर्स तसेच उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण आशा 187 जणांना याच रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले होते.यामध्ये रुग्णालयातील 57 रुग्ण, रुग्णांचे 72 नातेवाईक तसेच 58 रुग्णालय कर्मचारी यांचा समावेश होता.
या सर्वांचे स्वॅबचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, हे रिपोर्ट येण्यापूर्वीच अंधाराचा फायदा घेत 187 क्वारंटाईन संशयितांपैकी 9 कंत्राटी कर्मचारी, 10 रुग्णांचे नातेवाईक आणि 5 रुग्ण असे एकूण 24 कोरोना संशयित पळून गेले आहेत.