प्रतिनिधी / पणजी
कोविड 19 मुळे टाळेबंदीचा परिणाम सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. संगीत क्षेत्र व नाटय़क्षेत्र त्याला अपवाद नाही. शास्त्राrय संगीताच्या क्षेत्रात सध्या संगीत मैफली, संगीत संमेलने, संगीत वर्ग यांना विराम मिळाल्यामुळे संपूर्ण क्षेत्र सामसूम झाले आहे. सामसूम असले तरीही या क्षेत्रातील कलाकारांच्या साधनेला बहर आला आहे. संगीताव्यतिरिक्त नवीन काही गोष्टी व आपली आवड जपण्यासाठी त्यांना मोकळा वेळ मिळत आहे.
प्रसिद्ध गायिका प्रचला आमोणकर
प्रसिद्ध शास्त्राrय तथा उपशास्त्राrय गायिका प्रचला आमोणकर यांनी लॉकडाऊनच्या काळात रियाज तर चालूच ठेवला आहे. पण याशिवाय शिकवण्या बंद असल्याने ऑनलाईन शिकवण्या घेत आहेत. याचबरोबर दोन ते तीन तास रियाजही सुरूच आहे. गोव्याबाहेरील काही विद्यार्थी भेटायला येऊ शकत नाही त्यामुळे त्यांच्या शिकवण्या ऑनलाईन घेण्यात येतात. विशेष म्हणजे या काळात ‘गझल’ या नवीन प्रकारचा अभ्यास करत आहेत.
राजदीप करतोय रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा उपक्रम
सोशल मीडीयावर ‘वासंती’ या मजेशीर व्हिडिओने सर्वांचे मनोरंजन करणारा कलाकार राजदीप नायक कलाकारांना रोजगार संधी निर्माण करण्यासाठी सध्या लॉकडाऊनच्या काळात प्रयत्न करत आहेत. याशिवाय हॉस्पिटलमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करून लोकांना अल्कलाईन पाणी देऊन रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय घराघरात असलेल्या वॉटर फिल्टरमध्ये असलेले पाणी अल्कलाईन करण्याचा प्रयत्न करणार आहे असे राजदीप नायक यांनी सांगितले.
देवा मालवणकर गुंतले रियाजात
प्रसिद्ध कलाकार, गायक देवा मालवणकर या टाळेबंदीच्या काळात रियाजाने स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. याशिवाय नवीन कम्पोझिशन, नवीन नाटक वाचनाने आपला वेळ घालवित आहेत. मासेमारी, कुकिंग यासारखे विविध छंदही ते जोपासत आहेत. महत्त्वाचे म्हणजे जसा बोलतो तसा जगतो असे तत्त्व जीवनात आत्मसात करणारा माणूस आपल्या कुटुंबियांना वेळ देत आहे. कोविड 19 मुळे असलेल्या लॉकडाऊनने कुटुंबियांची किंमत कळून दिली. मायेने जगू शकतो आणि आत्मचिंतन करू शकतो हे शिकविले असे मत मालवणकर यांनी व्यक्त केले.
नवीन अभंगाची तयार करतायेत धुन दिंडी व भजनी कलाकार बाबू गडेकरही रियाजात गुंतले आहेच. याशिवाय नवीन दिंडी, नवीन अभंगाची धुनही तयार करत आहे. याव्यतिरिक्त संगीत क्षेत्रातील व्हिडिओ पाहत आहेत.