सातारकरांचा सहभाग असलेला चित्रपट : दहाव्या फाळके फिल्म फेस्टिवलमध्ये सन्मान
प्रतिनिधी/ सातारा
सातारच्या मातीत तयार झालेल्या ‘घोडा’ या चित्रपटाला दहाव्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टिव्हलमध्ये स्पेशल ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या चित्रपटाचे दिग्दर्शन टी. महेश यांनी केले आहे. सोबतच सातारच्या लिंब गावचे निर्माते अनिल वणवेंच्या ‘वन वे प्रोडक्शन’ सोबत त्यांच्या ‘टी महेश प्रोडक्शन’ या कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
एक्सक्यूटीव्ह प्रोडय़ुसर म्हणून कोरेगावच्या उमेशचंद्र शिंदे यांनी काम पाहिले आहे .या चित्रपटाचे चित्रीकरण हे सातारा, लिंब, कुशी आणि सातारा परिसरात झाले आहे. या चित्रपटाची कथा आणि गीते सातारचे नाटय़-चित्रपट लेखक जमीर आतार यांनी लिहिली आहे, तसेच पटकथेमध्येही त्यांनी महेश मुंजाळे यांना सोबत केली आहे. या चित्रपटाचे संवाद सातारच्या महिगावचे सुपुत्र निलेश महिगावकर यांचे आहेत. या चित्रपटाच्या नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी ही सातारच्या धैर्यशील उत्तेकर यांनी सांभाळली आहे.
अभिनेता कैलाश वाघमारे, राहुल बेलापूरकर, अर्चना महादेव आणि नेहा भोसले या बाहेरील कलावंतांबरोबरच चित्रपटातील सर्व कलावंत हे सातारा जिह्यातील असून वज्र पवार, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, पंकज काळे, रुक्मिणी सुतार, आकाश पाटील, दत्ता धनावडे, शुभम फडतरे, जय साळुंखे, विकास आढाव, श्रीकांत के. टी., नील केळकर, महेश चव्हाण, कल्याण राक्षे, दीपक देशमुख, नयना साळुंखे, राजन निकम, शिवराज नाळे, देवदत्त इंगवले, प्रशांत इंगवले, डॉ. निलेश माने, कुमुदिनी आदाटे, सुरज बाबर, अमर पवार, अमर शिंदे, मंदार कोल्हटकर, प्रणल लोखंडे या अभिनेत्यांनी उत्तम काम केले आहे.
तांत्रिक बाबीमध्ये ही सातारच्या संतोष भागवत, स्नेहा धडवई यांनी दिग्दर्शन सहाय्यक म्हणून काम पहिले तर प्रशांत इंगवले यांनी मेकअप आणि कॉस्चुमची जबाबदारी सांभाळली असून नितीन सूर्यवंशी आणि जय साळुंखे यांनी निर्मिती व्यवस्थापन पाहिले आहे. तर चित्रपटाचे चित्रीकरण योगेश कोळी, संकलन रोहण पाटील, स्टील फोटोग्राफर शार्दूल आफळे आणि गायन आदर्श शिंदे, संगीत विनीत देशपांडे यांनी केले आहे.
घोडा टीमच्या या यशाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे, नितीन दीक्षित, सचिन मोटे, संतोष पाटील, रवींद्र डांगे, बाळकृष्ण शिंदे, प्रमोद कोपर्डे, चंद्रकांत काबिरे, राजीव मुळ्ये, डॉ. मिलिंद सुर्वे, जगदीश पवार, प्रसाद देवळेकर, प्रसाद नारकर, राजेश मोरे, कल्याण राक्षे, चित्रा भिसे, अजय माळवदे यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.