नवी दिल्ली
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्ष प्रवक्ते संजय झा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःच ट्विटरवर यासंबंधीची माहिती दिली आहे. सध्या आपल्याला जास्त त्रास जाणवत नसला तरी पुढील किमान दहा-बारा दिवस उपचार सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून सतर्कतेसाठी आम्ही सर्व कुटुंबीयांनी होम क्वारंटाईन केले आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी’’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.