साहित्यः पाऊण वाटी रवा, 2 चमचे दही, अर्धी वाटी शुगर पावडर, पाव वाटी कोको पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, 1 चमचा व्हॅनिला इसेंस, अर्धा चमचा वेलचीपूड, पाव चमचा मीठ, पाणी आवश्यकतेनुसार, सजावटीसाठी चोको सिरप
कृतीः बाऊलमध्ये रवा घेऊन त्यात दही, शुगर पावडर, बेकिंग पावडर, वेलचीपूड, कोको पावडर आणि व्हॅनिला इसेंस घालून मिश्रण चांगले मिक्स करावे. नंतर त्यात पाणी घालून गुठळय़ा न राहता बॅटर बनवून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावे. आता इडली पात्राच्या साच्याला तुपाचा अथवा तेलाचा हात लावून चमचाच्या सहाय्याने चोको इडली बॅटर घालून एकसारखे करावे. इडली पात्रात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यावर साचा ठेवून झाकण ठेवावे. इडली पात्र प्रथम दोन ते तीन मिनिटे मध्यम आचेवर नंतर आच मंद करून सात ते आठ मिनिटे ठेवून वाफवावे. इडली पात्र गार झाले की झाकण काढून त्यातील साचा काढावा. तयार चोको इडली चोको सिरपने सजवून खाण्यास द्या.