ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मंगळवारी एका दिवसात 71 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये फरिदकोट येथील एकाच कुटुंबातील 13 जण आणि फतेहगढ साहिब मधील 2 रुग्णांचा देखील समावेश आहे. त्यामुळे पंजाबमधील कोरोना बाधितांची एकुण संख्या 2734 झाली आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आता पर्यंत 1 लाख 36 हजार 343 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या आहे. राज्यातील विविध रुग्णालयात 497 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आता पर्यंत कोरोनामुळे 55 जणांनी आपला जीव गमावला आहे.
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे कालच्या एका दिवसात 39 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत एकूण 2167 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.