दोन टक्केपेक्षा अधिकचा वाटा विकण्याचे संकेत
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय स्टेट बँकेने आपल्या स्टेट बँक लाईफमधील हिस्सेदारी विकणार असल्याची घोषणा केली आहे. यामध्ये बँक जवळपास कमीत कमी दोन टक्क्मयांपेक्षा अधिकचा हिस्सा विकणार आहे.
नियमांचे पालन करण्यासह हिस्सेदारी विकण्यात येणार आहे. तसेच बँकेच्या बाँडस्च्या सहाय्याने 1.5 अब्ज डॉलर्स उभारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. भारतीय स्टेट बँकेने केंद्रीय बोर्डाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला असल्याचा तपशील शेअर बाजाराला स्टेट बँकेने दिला आहे.
सार्वजनिक हिस्सेदारी 25 टक्क्मयांच्या नियमाच्या अधिन राहून स्टेट बँकेने लाईफमधील 2,10,00,000 इक्विटी समभाग विकण्यास मंजुरी दिली आहे. सदरची हिस्सेदारी विकण्याची प्रक्रिया ही शेअर बाजार व्यवस्थेच्या नियमावलीच्या आधीन राहून करण्यात येत असल्याचेही स्पष्टीकरण यावेळी बँकेने दिले आहे. यासोबत स्टेट बँक लाईफने शेअर बाजाराला दिलेल्या वेगळय़ा माहितीमध्ये स्टेट बँक हिस्सेदारी विक्रीसाठी कमीत कमी 725 रुपयाचे समभाग मूल्य निश्चित करणार असल्याचे म्हटले आहे.