प्रतिनिधी/ बेळगाव
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे विष्णू गल्ली, वडगाव येथे मंगळवारी आर्सेनिक अल्बम-30 या रोगप्रतिकारशक्ती वर्धक गोळय़ांचे वाटप करण्यात आले. सध्या कोरोनाचे संकट असल्याने नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी शहर समितीने सरचिटणीस किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला आहे.
माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांच्या हस्ते गोळय़ांचे वितरण करण्यात आले. यावेळी शिवप्रति÷ानचे विभागप्रमुख पुंडलिक पावशे, अजय देसाई, विनायक कोकितकर, भूषण आजरेकर, स्नेहल देसाई, सुरेखा आजरेकर, प्रभा खमकारहट्टी, अलका पाटील, सरोज वरूटे, विमल चापोळकर, सुमित आपटेकर, पुष्पा आजरेकर, दीपा देसाई, सुमित आपटेकर, सूरज आजरेकर यांसह इतर नागरिक उपस्थित होते.