प्रतिनिधी /महाबळेश्वर :
महाबळेश्वरमधील हवामान खात्याच्या वेधशाळेमधील पर्जन्यमापकासह अनेक मोजमापक यंत्रणेशेजारीच उंच पाण्याची टाकी उभी केली आहे, त्यामुळे हवामानाच्या अचूक निरीक्षणामध्ये धोका निर्माण होण्याची भीती हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांना वाटत आहे. ही टाकी व त्याखालील लोखंडी मनोरा त्वरित काढून टाकी इतर ठिकाणी हलवण्याची मागणी कृती मौसम विज्ञान विभाग कुलाबा यांनी सातारा सिव्हील सर्जन तसेच महाबळेश्वर येथील शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षकांना एका पत्राद्वारे केली आहे .
महाबळेश्वर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारतीय मोसम विभाग संचालित कुलाबा वेधशाळेची (हवामान खात्याची) अत्याधुनिक मोजमापक यंत्रणा असलेली सुसज्ज वेधशाळा आहे. मुख्य इमारती शेजारील मोकळ्या जागेत पर्जन्यमापकसह हवामान संबंधित विविध मोजमापक यंत्रणा बसविण्यात आली आहे. गेले अनेक दशके ती आहे त्याच ठिकाणी आहे. त्याचे अविरत कार्य व निरीक्षण येथून सातत्याने सुरु असते. वेधशाळेशेजारी शासकीय ग्रामीण रुग्णालय असून सध्या ते प्रायोगिक तत्वावर रेड क्रॉस संचालित बेल एअर हॉस्पीटला चालविण्यास दिले आहे. नुकतेच या हॉस्पिटलचे नूतनीकरण व अत्याधुनिकरण करण्यात आले. यावेळी वेधशाळेच्या पर्जन्यमापकसह हवामान संबंधित विविध मोजमापक यंत्रणेच्या शेजारीच एक उंच पाण्याची टाकी आरोग्य विभागाकडून उभी करण्यात आली आहे. तिचा दूष:परिणाम शेजारील तापमापन यंत्रणेवर होत आहे. त्यामुळे महाबळेश्वरातील हवामानाबाबतच्या रोजच्या निरीक्षणात व त्याची नोंद अचूकपणाने घेण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.
सध्या सर्वत्र मान्सून पावसाचे आगमन झाले असून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरही यास अपवाद नाही. येथेही सध्या जोरदार पाऊस बरसणे सुरु असून महाराष्ट्रातील ब्रिटीश काळापासूनचे महत्वाचे हे पर्यटनस्थळ आहे. येथील थंडी, उन्हाळा तसेच पावसाळा आदी काळातील हवामान बदलाच्या रोजच्या अचूक नोंदी यांना स्थानिकासह राष्ट्रीयस्थरावर विशेष महत्व आहे. या हवामानाच्या बदलाचे निरीक्षण व त्याची रोजची नोंद या खात्याचे तज्ञ वरील अत्याधुनिक यंत्रणा व मोजमापकाकरवी दररोज सकाळी साडे आठ वाजता, सकाळी साडे अकरा वाजता, दुपारी अडीच वाजता तसेच सायंकाळी साडे पाच वाजता करत असतात. येथील तापमान, पाऊस, दवबिंदू, हवेतील आद्रता, वाफ दाब, हवेची दिशा व त्याचा वेग, ढगांचे प्रकार (खराब हवामान), वीज, धुके व व्हीजीबिलीटी इत्यादीची नोंद करीत असतात. तसेच हा संपूर्ण डाटा रोजच्या रोज कुलाबा वेधशाळा, मंत्रालय, डिझास्टर यंत्रणा, एन. डी. शी. (नेशनल डेटा सेंटर) पुणे शिवाजीनगर, वल्ड मेट्रोलॉजीकल ओर्गनायझेशन (डब्लू एम. ओ) विविध जिह्यांचे जिल्हाधिकारी आदी महत्वाच्या ठिकाणी पाठविले जातात. जागतिक पातळीवर मोजमाप, निरीक्षण नोंदीची देवाण-घेवाण चालू असते. या दृष्टीने येथील या हवामान खात्याच्या तज्ञाच्या नोंदीला विशेष महत्व आहे.
तसेच महाबळेश्वर महत्वाचे पर्यटनस्थळ असल्याने या संपूर्ण नोंडीना त्या दृष्टीने विशेष महत्व आहे. मात्र या सर्व मोज मापक यंत्रणेच्या शेजारीच महाबळेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयाने पाण्याची सुमारे 25 ते 30 फुटावर पाण्याची टाकी ठेवल्याने त्याचा परिणाम या मोजमापक उपकरणांवर होत आहे. हवामानाच्या रोजच्या निरीक्षणात व त्याचा अचूक नोंदीमध्ये प्रचंड अडथळा निर्माण झाला आहे. सध्या सुरु असलेल्या पावसाच्या नोंदीवरही त्याचा परिणाम होण्याचा फार मोठा धोका येथील काम करणाऱया तज्ञांना वाटत आहे. दरम्यान कुलाबा वेधशाळेच्या संबंधित तज्ञांनी