प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रविवारी 20 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 13 पुरुष, 7 स्त्रियांचा समावेश आहे. एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 313 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 167 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी रविवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मार्डी तालुका उत्तर सोलापूर 1, कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर 2 , बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर एक , मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर एक, वांगी तालुका दक्षिण सोलापूर एक, करजगी तालुका अक्कलकोट एक, बुधवार पेठ अक्कलकोट 4, आदर्श नगर मोहोळ एक, कळसे नगर मोहोळ एक , वैराग तालुका बार्शी दोन, उपळाई ठोंगे तालुका बार्शी 2, सूर्वे बस्ती आगळगाव तालुका बार्शी एक , करकम तालुका पंढरपूर एक, संभाजी चौक पंढरपूर एक त्या क्षेत्रात आढळले आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 141 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 121 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 20 पॉझिटिव्ह आढळल्या आहेत . 313 रुग्णांपैकी 195 पुरुष 118 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 130 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 66
बार्शी – 49
माढा- 8
माळशिरस – 5
मोहोळ- 17
उत्तर सोलापूर – 23
करमाळा- 1
सांगोला – 3
पंढरपूर 9
दक्षिण सोलापूर – 132
एकूण – 313
होम क्वांरटाईन – 1956
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 3568
प्राप्त अहवाल- 3552
प्रलंबित अहवाल- 36
एकूण निगेटिव्ह – 3220
कोरोनाबाधितांची संख्या- 313
रुग्णालयात दाखल – 167
आतापर्यंत बरे – 130
मृत – 16