ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज पहाटेच्या सुमारास चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
आज पहाटेच्या सुमारास नौगाम सेक्टरमध्ये काही दहशतवादी एलओसीमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. दहशतवाद्यांकडील दोन एके -47, 12 भरलेली मॅगझीन, एक पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे. तसेच भारतीय आणि पाकिस्तानी चलनाच्या अंदाजे 1.50 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अजूनही या भागात सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे.