ऑनलाईन टीम / लंडन :
चीनचे प्रसिद्ध व्हिडिओ एन्टरटेनमेंट ॲप ‘टिकटॉक’चे मुख्यालय लंडनला हलविण्याचा कंपनीचा विचार आहे. त्यादृष्टीने ब्रिटन सरकारबरोबर कंपनीची चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
चीनच्या बाईट डान्स या कंपनीकडे ‘टिकटॉक’ या ॲपची मालकी आहे. मागील महिन्यात भारताने चीनच्या 59 ॲप्सवर बंदी आणली. त्यानंतर अमेरिका, तैवान आणि जपाननेही चीनविरोधी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. भारताने आणलेल्या बंदीमुळे टिकटॉकला मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे चीनच्या मालकीपासून दूर राहण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
टिकटॉकने कॅलिफोर्नियात आपला विस्तार वेगाने सुरू केला आहे. मात्र, मुख्यालय हे लंडनमध्ये करण्याचाच कंपनीचा विचार आहे. काही दिवसांपूर्वीच भारतासह अमेरिकेनेही चिनी ॲप्स ग्राहकांचा डेटा चोरी करून त्याचा गैरवापर करत असल्याचा आरोप केला होता. त्यावरून या कंपनीच्या डाटाची वॉशिंग्टनमध्ये कसून तपासणी करण्यात येत आहे.