प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचबरोबर मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने शहरात तसेच सरकारी कार्यालयाच्या परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सॅनिटायझर करण्यात आले.
कोरोना विषाणूंमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास गंभीर समस्यांना तेंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आता पुन्हा महापालिकेच्या माध्यमातून शहरामध्ये विविध भागांमध्ये सॅनिटायझरची फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पाण्याच्या टँकरलाच हे फवारणी स्प्रिंकलर बसविण्यात आले होते. त्यामुळे अतिवेगाने सॅनिटायझरची फवारणी करण्यात येत आहे.