ऑफिस नॅशनल स्टॅटिस्टिक्सची माहिती
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटन आज आर्थिक मंदीच्या वाटेवर पोहोचला असल्याची माहिती बुधवारी सरकारी एजन्सीज ऑफिस नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीमधून स्पष्ट करण्यात आली. चालू वर्षात दुसऱया तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत ब्रिटनची अर्थक्यवस्था ही 20.4 टक्क्यांनी घसरली आहे. अशा प्रकारची स्थिती या अगोदर 2009 मध्ये आल्याचे यावेळी म्हटले आहे.
पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) या दरम्यान ब्रिटनचा जीडीपी 2.2 टक्क्मयांनी घसरला होता. ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सचे जोनाथन एथो यांच्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या कारणामुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. अर्थशास्त्राच्या नियमानुसार अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीत घसरणीत राहिल्यास तिचा मंदीचा प्रवास सुरु झाल्याचे मानले जाते किंवा तसे संकेत असल्याचे मानले जाते.
उपलब्ध माहितीनुसार जून महिन्यात रिकव्हरीचे संकेत मिळाले होते. जूनमध्ये ब्रिटनच्या जीडीपीमध्ये मे’च्या तुलनेत 8.7 टक्क्मयांची वाढ पहावयास मिळाली होती. तर एथो यांच्या माहितीप्रमाणे जूनमध्ये ब्रिटनचा जीडीपी फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत जवळपास 16.66 टक्क्मयांनी घसरल्याची नोंद करण्यात आली होती.