वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निर्यात तत्परता निर्देशांक 2020 चा अहवाल नुकताच सादर करण्यात आला आहे. यामध्ये देशातील प्रमुख राज्यापैकी गुजरातने अव्वल स्थान प्राप्त केले असून सोबत महाराष्ट्राने दुसरा आणि तामिळनाडूने तिसरा क्रमांक प्राप्त केल्याची माहिती बुधवारी केंद्र सरकारच्या थिंक टँक नीति आयोगाकडून बुधवारी सादर केलेल्या अहवालातून देण्यात आली आहे.
सदरच्या कोविड आणि लॉकडाऊनच्या कालावधीत राजस्थानने चांगली कामगिरी केली असून सोबत तेलंगणा आणि हरियाणाचाही नंबर लागत असल्याचे म्हटले आहे. पूर्वेकडच्या राज्यामध्ये उत्तराखंड सर्वोच्च राहिला आहे. तर त्यापाठोपाठ त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेश यांनी मजल मारली आहे.
दुसऱया बाजूला केंद्रशासित प्रदेशाची स्थिती पाहिल्यास यामध्ये दिल्लीने आकर्षक कामगिरी केली असून त्यानंतर गोवा आणि चंदीगढ यांचाही समावेश राहिलेला आहे. प्रामुख्याने छत्तीसगढ आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये निर्यातीस चालना मिळावा यासाठी विशेष पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
दिर्घकालीन विकासासाठी निर्यातीत तेजी हवी
देशाच्या दिर्घकालीन आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी निर्यात क्षेत्रातील तेजी अतिशय महत्वपूर्ण असल्याचा विश्वास याप्रसंगी नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी व्यक्त केला आहे.