नवी दिल्ली
गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत कार्यालयीन गाळय़ांच्या मागणीत जवळपास 73 टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती नुकतीच उपलब्ध झाली आहे. दिल्ली-एनसीआर भागात नव्या कार्यालयीन गाळय़ांची मागणी जवळपास 93 टक्के इतकी घटली असल्याचे समोर आले आहे. कार्यालयीन गाळे भाडे तत्वावर देण्याच्या प्रमाणातही मोठय़ा प्रमाणात घट झाली असल्याचे समोर आले आहे. चालू वर्षी पहिल्या 6 महिन्यात 18 लाख चौरस फूटचे गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. कोरोनाचा या व्यवसायावर परिणाम झाला आहे.