- संयुक्त सचिवांनी दिले कोटला कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश
ऑनलाईन टीम / दिल्ली :
दिल्ली आणि डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) फिरोज कोटला परिसरातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. कार्यालयातील एका सदस्याला कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिवांच्या गैरहजेरीत संयुक्त सचिव राजन मनचंदा यांनी पुढील नोटीस मिळेपर्यंत कोटला येथील कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले अनेक कर्मचाऱ्यांना आता होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
पुढे ते म्हणाले, संपूर्ण कार्यालयाचे लवकरच सॅनिटायझेशन केले जाणार आहे. तसेच पुढील आदेश मिळाल्यानंतर कार्यालयात येताना कर्मचाऱ्यांकडे त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.