ऑनलाईन टीम / ठाणे :
महाविकास आघाडी मधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचेे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, ‘काल मी माझी कोविड-19 ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती…’
सध्या एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.