प्रतिनिधी/ सातारा
एमपीएससी, युपीएससी परिक्षांसाठी परिवहन महामंडळ सातारा आगारातून ज्यादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आगार व्यवस्थापक कनिष्ठ रेश्मा गाडेकर यांनी दिली.
गाडेकर म्हणाल्या, 1 ते 9 ऑक्टोबरपासून एमपीएससी, युपीएससी परिक्षा सुरू होणार आहेत. परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना वेळेत हजर राहता यावे. म्हणून सातारा ते पिंपरी-चिंचवड 5, सातारा ते स्वारगेट 3 बसेस सोडण्यात येणार आहेत. पहाटे 5 वाजल्यापासून ते सांयकाळी 6 वाजून 30 मिनिटापर्यंत फेऱया सुरू राहणार आहेत. विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यांची काळजी घेतली जाणार आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक फेरीनंतर बसचे निरजर्तुंकीकरण करण्यात येणार आहे.