बेळगाव / प्रतिनिधी
हंदिगनूर येथे तब्बल 21 एकरमध्ये महात्मा गांधी उद्योग खात्रीतून तलाव निर्मितीचे काम सुरू होणार आहे. या तलावाच्या जागेची रितसर कागदपत्रे (जमिनीचा कब्जा) ग्राम पंचायतीकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी काकतीचे सर्कल एस. बी. बिजगती, तलाठी पी. एल. होनगेकर यांनी तलावाची रितसर कागदपत्रे जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी मलगौडा पाटील, अरुण कटांबळे, ता. पं. उपाध्यक्ष मारुती सनदी, सर्कल एस. बी. बिजगती, तलाठी पी. एल. होनगेकर, पीडीओ लिला मेत्री, ग्रा. पं. माजी अध्यक्षा आनंदी तवनोजी, ग्रा. पं माजी सदस्य नागेश नाईक, रोजगार हमी योजना संघटनेचे अध्यक्ष जोतिबा मनवाडकर आदींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
तालुक्मयातील या सर्वात मोठय़ा तलावामुळे हंदिगनूर परिसरातील कट्टणभावी, बोडकेनट्टी या गावांनाही याचा फायदा होणार असून परिसरातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शिवारातील कूपनलिका व विहिरींच्या पाण्याची पातळी बारमाही टिकून राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱयांना उन्हाळय़ातही शेती फुलवता येणार आहे. या तलावाच्या कामामुळे हंदिगनूरसह कडोली, बंबरगा, अगसगा परिसरातील हजारो रोजगार कामगारांना काम उपलब्ध होणार आहे. साधारण 4 ते 5 वर्षे चालणाऱया या तलावाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती हंदिगनूर ग्राम पंचायतीने दिली.
यावेळी बोलताना जोतिबा मनवाडकर म्हणाले, जवळ-जवळ साडेतीन वर्षे या तलावाच्या कामाचा पाठपुरावा सुरू होता. आता रितसर तलावाची कागदपत्रे मिळाली याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नामुळे तलावाचे काम लवकर सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मलगौडा पाटील, अरुण कटांबळे, एस. बी. बिजगती, पी. एल. हेनगेकर यांनी विचार क्यक्त केले. यावेळी मारुती तरवाळ, रामा कोरे, परशराम डोंगरे, गुंडू धुमाळे, निवृत्त सुभेदार प्रकाश बेळगावकर, राजू धुमाळे, राजू हेनामगावडे, बाळू पाटील, निकिता मोहनगेकर, लक्ष्मी पाटील, पूजा पाटील, मंजुळा पाटील, शालन कांबळे यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन मारुती तरवाळ यांनी केले. जोतिबा मनवाडकर यांनी आभार मानले.