238 जण झाले कोरोनामुक्त , महिलेसह दोघा जणांचा मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
सोमवारी जिह्यातील 238 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 73 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण बाधितांच्या संख्येने 22 हजार 319 चा आकडा पार केला आहे. महिलेसह दोघा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार बेळगाव शहर व उपनगरातील 21 व ग्रामीण भागातील 4 असे तालुक्यातील 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिह्यातील 73 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या हेल्थबुलेटीनमधील आकडा मात्र 444 आहे.
आरोग्य विभागाच्या घोळामुळे रोज बाधित व मृतांच्या आकडेवारीत मोठी तफावत दिसून येत आहे. रोजच्यारोज आकडेवारींची नोंद न करता जुने आकडे मिळून एकदाच जाहीर करण्याची प्रथा वाढली आहे. बेळगाव शहरातील एक युवक व बैलहोंगल येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बेळगाव शहर व जिह्यातील कोरोनामुक्त झालेल्या 238 जणांना सोमवारी घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 19 हजार 804 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 2 हजार 197 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 318 वर पोहोचला आहे.
हिरेबागेवाडी, मारिहाळ, शाहूनगर, शट्टी गल्ली, अयोध्यानगर, भाग्यनगर, चव्हाट गल्ली, सांबरा, हिंडलगा, जाधवनगर, कुमारस्वामी लेआऊट, पाटील गल्ली, सदाशिवनगर, सह्याद्रीनगर, शास्त्राrनगर, टिळकवाडी, वडगाव, वैभवनगर, इंडाल कॉलनी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.