कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या सात महिन्यांपासून न्यायालयीन कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे पक्षकार आणि वकील अडचणीत आले आहेत. एक तर निकाल मिळायला उशीर लागतो. त्यात कोविडमुळे न्यायलये बंद असल्याने खटले निकालाला आणखीनच विलंब होत होता. त्यामुळे न्यायालये सुरू करावीत, अशी मागणी जोर धरत होती. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली. सोमवार दि. 12 पासून न्यायालये सुरू झाली. मात्र, जाचक अटींमुळे न्यायालये सुरू होऊनही पक्षकारांना आणि वकिलांना त्रास सहन करावा लागणार आहे.
न्यायालयात प्रवेश हवा असेल तर कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. 48 तासांपर्यंत तपासणी केलेले प्रमाणपत्र देणे अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पक्षकारांना हे प्रमाणपत्र दाखल करणे अशक्मय असल्याने ज्ये÷ वकिलांतून याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. न्यायालयामध्ये न्यायाधीशांचा विभाग पूर्णपणे प्लास्टिकने संरक्षित करण्यात आला आहे. मात्र, वकिलांची काहीच दखल घेण्यात आली नाही, याबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायालये सुरू झाल्यामुळे समाधान असले तरी कोरोनाचे प्रमाणपत्र दाखल करणे अनेकांना अशक्मय आहे. त्यामुळे न्यायालये सुरू होऊनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही, असे ज्ये÷ वकिलांचे म्हणणे आहे.
न्यायालय आवारात पार्किंग करण्यास हिरवा कंदील
न्यायालयाच्या आवारामध्ये फक्त वकिलांच्या वाहनांना पार्किंग करण्याची मुभा देण्यात आली आहे. जुन्या म्हणजेच जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये वकिलांना पार्किंगसाठी जागा देण्यात आली आहे. जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात न्यायालयीन कर्मचाऱयांची वाहने पार्किंग करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, याबद्दलही वकीलवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली असून जेएमएफसी न्यायालयाच्या इमारतीतच अधिन न्यायालय असल्याने त्या परिसरात वकिलांना पार्किंग करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हवे तर न्यायालयाच्या आवारात रॅपीड टेस्ट करा
कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आणणे अवघड जाणार आहे. तेव्हा न्यायालयाच्या आवारातच न्यायालयात येणाऱया प्रत्येक व्यक्तीची रॅपीड टेस्ट करावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे. न्यायालये सुरू करण्यात आली तरी न्यायालयाची लायब्ररी तसेच कॅन्टीन बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे वकीलवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. एकूणच न्यायालये सुरू झाली तरी गोंधळाचे वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे.