दुचाकी चोऱयांचे सत्र सुरुच : चोरटय़ांच्या उद्योगाने नागरिक त्रस्त
प्रतिनिधी / सातारा
साताऱयात दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्केट, भाजी मंडई, हॉस्पिलट परिसरातील पार्किंगसह अगदी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी चोऱया सुरुच आहेत. एकीकडे पोलीस दुचाकी चोरटय़ांचे टोळी जेरबंद करत असले तरी दुचाकी चोऱया थांबलेल्या नाहीत. त्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दि. 11 रोजी साताऱयातून दोन दुचाकी लंपास केल्याची घटना घडली असून याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱयातील मंगलमूर्ती हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या कँटीनजवळील पार्किंगमध्ये पार्क पेलेली 20 हजार रुपये किंमतीची मोपेड अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेली आहे. याबाबत जयश्री संग्राम पाटील (वय 34, रा. गजानन प्राईड, विलासपूर, गोडोली, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तर दुसऱया घटनेत मध्यवस्तीत असलेल्या शनिवार पेठेत घरासमोर पार्क केलेली 10 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरटय़ाने चोरुन नेल्याची घटना दि. 10 रोजी घडलीय. याबाबत रियाज बालेखान सय्यद (वय 55, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या चोरीचा तपास हवालदार के. एम. जाधव व जगदाळे करत आहेत. साताऱयात गेल्या काही महिन्यापासून असंख्य दुचाकी चोरीस गेल्या आहेत. त्यापैकी काहींचा तपासही पोलीस दलाने लावत आरोपींना जेरबंद केले आहे. मात्र दुचाकी चोरीच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. दुचाकी चोरीस गेल्यानंतर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी चोरटय़ांमध्ये बेरोजगार युवक गुंतले असून आता हा प्रकार कसा थांबणार हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे.