प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऑल इंडिया टेन्ट डिलर्स वेलफेअर ऑर्गनायझेशन नवी दिल्ली संलग्न ऑल महाराष्ट्र डिलर्स ऑर्गनायझेशन यांच्या अंतर्गत येणाऱया रत्नागिरी जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आल़ा . या आंदोलनात जिह्यातील सर्व जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमरेश सावंत, उपाध्यक्ष राजन कोकाटे, सुहास ठाकूरदेसाई, खजिनदार मिलिंद गुरव व प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होत़े माजी खासदार नीलेश राणे यांनी या आंदोलकांना भेट देत पाठिंबा दर्शवला
कोरोना महामारीमुळे देश व देशाअंतर्गत व्यावसायिकांना मोठया आर्थिक आडचणीला सामोरे जावे लागत आहे. सर्वच साव्&ढजनिक कार्यक्रमांना स्थगिती असल्याने टेन्ट, मंडप, पॅटरिंग, मंगल कार्यालय, बॅक्वेट हॉल, डि.जे., साऊंड, लाईट, डेकोरेशन, इव्हेंट व्यवस्थापक इत्यादी सेवा देणारे लाखो लोक आर्थिक अडचणीत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील असोसिएशनच्या माध्यमातून अनलॉक प्रक्रियेमध्ये हॉल, मंडप उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात अली होती. यासाठी विविध निवेदने सुद्धा देण्यात आली. मात्र शासनाकडून हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने सोमवारी राज्यभरात मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स चालक मालक धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला.
केंद्रसरकारने 15 ऑक्टोबर पासून 200 व्यक्तींची परवानगी दिलेली असूनही राज्य सरकार उदासीन असल्याने विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आल़े रत्नागिरी सर्व जिल्हा मंडप, लाईट, साऊंड इव्हेंट्स आणि केटरर्स असोसिएशनतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करत निषेध व्यक्त केल़ा