ऑनलाईन टीम / शिमला :
खाजगी शाळांमधील विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. शिक्षण मंत्री गोविंद सिंह ठाकुर यांनी सर्व खाजगी शाळांमध्ये केवळ ‘ट्युशन फी’ घेण्याचे आदेश दिले आहेत.
हे सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त शिमला यांना व्यवस्था करण्यास सांगितले आहे. तसेच या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.
मात्र, असे आदेश दिले असले तरी काही शाळांनी पूर्ण फी घेतली आहे. ती रिफंड मिळणार की नाही याबाबत अजून माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, खाजगी शाळांच्या मनमानी प्रशासनावर नाराज असलेल्या पालकांची शिक्षणमंत्री गोविंद सिंह ठाकुर यांनी भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. तसेच मार्च पर्यंत सर्व शाळांवर अंकुश ठेवण्यासाठी कायदा केला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.