ऑनलाईन टीम / बर्लिन :
जर्मनीत भारतीयांची हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फ्रँकफर्टच्या एका न्यायालयाने 54 वर्षीय भारतीय गुप्तहेराला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला 2,400 यूरो म्हणजेच 2.16 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
बलवीर एस असे या गुप्तहेराचे नाव आहे. तो जर्मनी येथील शिख आणि काश्मिरी समाजाची गुप्त माहिती चोरत होता. फ्रँकफर्ट येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांशी ओळखी वाढवून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याची जबाबदारी या गुप्तहेरावर होती, असा आरोप आहे.
गुप्तहेरी प्रकरणी बलवीर यांना एका वर्षांच्या कारावासासोबत दोन वर्ष आणखी तुरुंगात काढावे लागतील, जो प्रोबेशन पिरिअड असणार आहे.