प्रतिनिधी / कोल्हापूर
शहराच्या रमणमळा व राजेंद्रनगर परिसरात दुचाकीवरुन आलेल्या चोरटÎांनी धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील चेन हिसडा मारुन लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमध्ये 5 तोळे सोन्याच्या चेन चोरटÎांनी लंपास केल्या असुन यामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान रमणमळा परिसरातील घटनेत इराणी टोळीचा तर राजेंद्रनगर येथील चेनस्नॅचिंगमध्ये स्थानिक गुन्हेगाराचा हात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी बेनेदिक्कत मार्टिस (वय 70 ) या रमणमळा छत्रपती पार्क येथील पॅलेस व्हील अपार्टमेंटमध्ये राहतात. याच परिसरात असणाऱया नातेवाईकांकडे शनिवारी सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास पायी चालत निघाल्या होत्या. यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरटÎांनी बेनेदिक्कत मार्टिस यांच्या गळ्यातील चेनला हिसडा मारला. यामध्ये त्यांच्या गळ्यातील एक पूर्ण चेन तर दुसरी अर्धवट चेन चोरटÎांच्या हाती लागली. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकीवरुन आलेल्या चोरटÎांनी धूम स्टाईलने पोस्ट ऑफिसच्या दिशेने पलायन केले. 22 ते 25 वर्षे वयोगटातील दोघा तरुणांनी हे कृत्य केले असून दुचाकीचालविणाऱयाने पांढऱया रंगाचा शर्ट व तपकिरी रंगाची पँट तर डोक्यास काळ्या रंगाचे हेलमेट तसेच पाठीमागे बसलेल्या तरुणाने मास्क लावला असल्याचे समोर आले आहे.
तर राजेंद्रनगर येथे घडलेल्या घटनेची फिर्याद स्मिता सुरेश पवार (वय 47 रा. म्हाडा कॉलनी, महालक्ष्मी पार्क, राजेंद्रनगर) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली. शनिवारी दुपारी स्मिता पवार घराच्या दारात दुचाकीवर बसून भाचा जयराज याच्यासोबत बोलत थांबल्या होत्या. यावेळी एसएससी बोर्डकडून मोपेडवरुन आलेल्या दुचाकीस्वाराने स्मिता पवार यांच्या गळ्यातील चेन हिसडा मारुन हातोहात लांबवली. यानंतर त्याने धूम स्टाईलने पलायन केले. मोपेडवरुन आलेल्या चोरटÎाने शेवाळी रंगाचे जॅकेट, घातल्याचे समोर आले आहे.
इराणी टोळी आणि दुचाकी नंबर
चेन स्नॅचिंगच्या दोनही घटना सिसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाल्या आहेत. रमणमळा येथील घटनेत दोन तरुण दिसत असून त्यांच्या देहबोलीवरुन ते इराणी टोळीतील असल्याचा संशय पोलीसांना आहे. तर राजेंद्रनगर येथील चोरटा स्थानिक असुन त्याच्या मोपेडचा नंबर पोलीसांच्या हाती लागला आहे.