निपाणी / प्रतिनिधी
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीच्या कामासाठी निधी संकलन अभियानाचा एक भाग म्हणून निपाणीत सोमवार 11 रोजी रामभक्तांचा तालुकास्तरीय मेळावा होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचारप्रमुख भगतरामजी छाबडा मार्गदर्शन करणार आहेत. निपाणीतील व्हीएसएम महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी 4 वाजता हा मेळावा होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता शोभायात्रा निघणार आहे. तरी रामभक्तांनी पारंपरिक पोशाख व हातात भगवे झेंडे घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.