ऑस्ट्रेलियाच्या मार्वा इब्राहिमचा विक्रम मोडित
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
हुबळी येथे स्तुती किशोर कुलकर्णी हिने जलद इनलाईन व्हील हुप्स स्पिनिंग करून ऑस्ट्रेलियाच्या मारवा इब्राहिमने नोंदवलेला 27.26 सेकंदाचा जुना विक्रम मोडीत काढीत 24 सेकंदाचा नवीन विक्रम नोंदविला आहे. या विक्रमाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याकडे शिफारस केली आहे.
स्तुती कुलकर्णी ही 10 वर्षाची विद्यार्थीनी असून, परिवर्तन गुरूकुल हेरिटेज स्कुल हुबळी येथे शिकत आहे. लहानपणापासूनच स्तुतीला हुप्स फिरविण्याचा छंद होता. तिने नंतर त्याचे स्केटींगमध्ये परिवर्तन करून जय्यत सराव केला होता. यापूर्वीही स्तुतीने इंडिया बुक रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड, पब्लिक ऑफ इंडिया यासारखे तीन विक्रम हुप्स फिरविण्यात केले आहेत. 2019 मध्ये हायव्हील इनलाईन स्केटींगमध्ये 9 मि. 27 सेकंद वेळ घेत एशिया बुक रेकॉर्ड, गोल्डन बुक ऑफ रेकॉर्ड आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. 2020 फेब्रुवारीमध्ये इनलाईन हुप्स स्केटींगमध्ये सलग 42 मिनिटे 12 सेकंदाचा विक्रम केला होता. तिने या नवीन विक्रमाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.