ऑनलाईन टीम / पुणे :
वसुंधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत मूळव्याध व हर्निया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २१ जानेवारी ते बुधवार, दिनांक २६ जानेवारी या दरम्यान हे शिबिर होणार आहे. सहकारनगर येथील श्री गजानन महाराज मठाजवळील वसुंधरा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत शिबिर होणार आहे.
शिबिरामध्ये हर्निया, मूळव्याध, भगंदर, फिशर, नाडीव्रण, गुदविद्रधी, मलबद्धता व इतर गुदरोगसंबंधी मोफत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यानुसार योग्य ते उपचार देखील सुचविण्यात येणार आहेत.
शिबिराचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी ८९७५४२९११२ या क्रमांकावर संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त रुग्णांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल मार्फत करण्यात आले आहे.