स्व.फटी गावकर स्मृती संगीत संमेलनात कलाकारांची सत्रे गाजली.
प्रतिनिधी / वाळपई
सत्तरीच्या मातीमध्ये कलेचा ओलावा आहे. या मातीमध्ये आतापर्यंत अनेक प्रकारची रत्ने जन्माला आली .प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारचे योगदान दिले. सत्तरी ही इतिहास असलेली भूमी आहे. येथील नागरिकांनी कधी हार मानली नाही. मात्र चिकाटी व जिद्दीच्या जोरावर सत्तरी तालुक्मयातील नागरिकांनी वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये आपली अभिमानास्पद प्रतिमा निर्माण केली .येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयातील कलाकार संगीत क्षेत्रांमध्ये निश्चितप्रमाणात अभिमानास्पद कामगिरी करणार व स्वर्गीय फटी गावकर स्मृती संमेलन हे तालुक्मयापुरते न राहता राज्यपातळीवर नेण्याची कुवत याकलाकारांमध्ये असल्याचे प्रतिपादन पत्रकार किशोर नाईक गावकर यांनी केले आहे .स्वर्गीय फटी गावकर स्मृती संगीत संमेलनाच्या दुसऱया अध्यायात ठाणे सत्तर येथील नवदुर्गा सातेरी देवस्थानच्या प्रांगणामध्ये उत्साहात सुरुवात झाली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. फटी गावकर हा उत्साहाचा झरा होता .आयोजन समितीच्या प्रयत्नाने सत्तरी तालुक्मयांमध्ये संगीत संमेलनाच्या आयोजनाची परंपरा सुरू झालेली आहे. हे खरोखरच अभिमानास्पद आहे. आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात मेळवली याठिकाणी उभारण्यात आलेले आंदोलन हे गोव्यासाठी निश्चितच आदर्शाचे आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून गोव्याला एक वेगळय़ा प्रकारचा धडा निर्माण झालेला आहे. सत्तरीचा माणूस हा मातीशी जवळीक साधणारा आहे. त्यांचे नाते हे मातीशी जडल्याने त्यांच्यामध्ये जिद्द व चिकाटीची असलेली भावना उत्स्फूर्तपणे समोर येत असते. म्हणूनच सत्तरीच्या सर्वागीण विकासाला गती प्राप्त होत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या आयोजन समिती अध्यक्ष सगूण वाडकर, केरी जि.प.सभासद देवयानी गावस,ठाणे सरपंच प्रजिता गावस,अँड. यशवंत गावस,आयोजन समिती कार्याध्यक्ष लक्ष्मण गावस,
कृष्णा गावस,माजी जि.प. सभासद पांडुरंग गावकर,देवस्थान पुजारी श्रीपाद गावकर, देवस्थानचे अध्यक्ष उत्तम गावकर, देवस्थानचे पुजारी कृष्णा गावस आयोजन समिती सचिव झिलू गावकर ,पंच सरिता गावकर,निलेश परवार ह्यांची खास उपस्थिती होती.
यावेळी आपल्या भाषणात पुढे बोलताना किशोर नाईक गावकर यांनी सांगितले की गोवेकर हे आपल्या राज्यातील वेगवेगळय़ा क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱया कलाकारांचा गौरव करण्यात कमी पडत आहे. ही खरोखरच खेदाची बाब आहे. यामुळे अनेकांनी आपल्या स्वभावगुणांमध्ये बदल करून प्रत्येकाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे तंत्र निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले .समाजाला दिशा मिळायची असेल तर निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मोबाईलचा अतिरेक यामुळे आज तरुणांपुढे दिशाहीनता निर्माण होत असून यामुळे येणाऱया काळात त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये पारंगत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारचे आवाहन केले.
आयोजन समितीचे अध्यक्ष सगुण वाडकर यांनी यावेळी बोलताना स्वर्गीय फुटी गावकर यांच्या अनेक आठवणी आपल्या विचारातून स्पष्ट केल्या. हाडाचा कार्यकर्ता व प्रामाणिक व्यक्तिमत्व यामुळे गावकर याने समाजामध्ये वेगळय़ा प्रकारचे नाते निर्माण केले होते. त्यांच्या आठवणीप्रित्यर्थ संगीत संमेलनाचे आयोजन खरोखरच चांगली प्रक्रिया असल्याचे यावेळी ते म्हणाले.
समितीचे सचिव झिलू गावकर यांनी यावेळी प्रास्ताविक करताना संगीत संमेलन आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट केला . ग्रामीण भागातील कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून ज्ये. भजनी कलाकार स्व. फटी गावकर यांच्या संगीत संमेलनाच्या माध्यमातून कलाकारांना संधी देऊन त्यांना समाजापुढे आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न असल्याचे यावेळी ते म्हणाले.लक्ष्मण गावस यांनी यावेळी उपस्थितांचे स्वागत केले. उद्घाटन सत्राचे आभारप्रदर्शन डॉ. सुंदर धुरी यांनी केले.
भजनी कलांकाराचा सन्मान.
सत्तरी तालुक्मयातील देवस्थानामधील भजनी कला समृद्ध करून त्याचे संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱया सत्तरी तालुक्मयातील ज्ये,भजनी कलाकारांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यात
हभप नारायण बर्वे (बांबर सत्तरी) , श्रीपाद गावस(ठाणे), गोपाळ गणेश हरवळकर( नगरगाव) गणेश यशवंत आयकर(पाल सत्तरी)
गोविंद नारायण गावकर(होंडा) याचे सुत्रसंचालन अंकुश धुरी यांनी केले.
हभप नारायण बर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना संगीत संमेलनाच्या माध्यमातून या भागातील संगीत क्षेत्रामध्ये सेवा करणाऱया कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले.
उत्कृष्ट नारदिया कीर्तनाने प्रारंभ
या संगीत संमेलनाचे उद्घाटन पारंपरिक समई प्रज्वलित करून करण्यात आले. तत्पूर्वी मुलांनी सादर केलेल्या मंगलचरणाने याचा शुभारंभ करण्यात आला .उत्कृष्ट ताल,लय व सुंदर गायन यांच्या माध्यमातून हे सादरीकरण अनेकांच्या मनाला भावले यात स्वतेजा कुंभार,मयुरेश सुतार, चैतन्य जोशी,श्रेयस गाडगीळ, श्रुती गावकर,प्राजक्ता जोशी,प्रांजली दामले,कल्याणी परब यांनी भाग घेतला. त्यांना तबल्यावर सुनील सुनिल माऊस्कर हार्मोनियमवर गुरुदास सुतार यांनी साथ संगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सालेलकर यांनी केले
अनेक सत्रे गाजली.
या संगीत संमेलनाच्या माध्यमातून नियोजित केलेले सर्व सत्रे चांगल्या प्रकारे गाजली .अनेकांनी हुबेहूब गायन तबला वादन हार्मोनियम वादन संतूर वादन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यात प्रथम सत्रात अर्जुन फटी गावकर यांचे शास्त्रीय गायन त्यानंतर सदानंद आमोणकर यांचे सतारवादन दुसऱया सत्रात मंदहास साळगावकर यांचे शास्त्रीय गायन रवी कृष्णा गावडे यांचे संवादिनी एकल वादन नरेश मडगावकर यांचे संतूरवादन पुष्पशील मळीक यांचे तबला एकल वादन चांगल्याप्रकारे गाजले. त्यांना तबल्यावर ज्ञानेश्वर नाईक दयेश कोसंबी उदय कुलकर्णी गीतेश मांदेकर व चंद्रकांत नाईक बाळकृष्ण गावकर शैलेश शिरोडकर सुनील म्हाऊस्कर तर हार्मोनियमवर राया कोरगावकर महेश गावस निलेश गाडगीळ गुरुदास सुतार यांनी साथ संगत केली. सौ सुमेधा देसाई यांनी सादर केलेल्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन याचा आस्वाद घेण्यासाठी मोठय़ा प्रमाणात संगीतकलाप्रेमी उपस्थित होते. अनेक प्रकारची दर्जेदार गाणी सादर करून त्यांनी प्रेक्षकांना अक्षरशः दोन तास खिळवून ठेवले.