इंटरनेटवर विक्रम मोडीत
अमेरिकेत भारतीय वशांच्या एका जोडप्याने धोतर आणि साडी या पेहरावात बर्फाळ भागात घेतलेली धाव आता चित्रफितस्वरुपात लोकांच्या मनावर राज्य करू लागली आहे. भारतीय जोडप्याची ही चित्रफित अमेरिकेच्या मिन्नेसोटा प्रांतातील अत्यंत लोकप्रिय स्की व्हिलेज वेल्ज येथील आहे. वेल्च गावात बर्फाच्छादनात धोतर अन् साडीमध्ये भारतीय वंशाच्या दिव्या आणि मधू यांची स्कीइंग करतानाची ही चित्रफित लोकांच्या पसंतीस उतरत आहे.
दिव्या आणि मधू यांनी ही चित्रफित आणि स्कीइंगच्या छायाचित्रांना इन्स्टाग्रामवर प्रसारित केले आहे. स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी आम्हाला काहीतरी वेडेपणा करण्याची गरज होती असे चित्रफित प्रसारित करत दिव्याने म्हटले आहे.
दिव्याने निळय़ा रंगाची साडी परिधान केली आहे. तर मधूने हिरव्या रंगातील पेहराव आणि धोतर असा पेहराव केला होता. त्यांच्या या चित्रफितीला आतापर्यंत 3 लाखांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या आहेत. मोठय़ा संख्येत लोक प्रतिक्रिया व्यक्त करत या जोडप्याचे कौतुक करत आहेत.