वृत्तसंस्था/ हाँगकाँग
चालूवर्षी होणाऱया आशियाई चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतून चायनीज एफए चषक विजेत्या शानडाँग लुनेंग फुटबॉल क्लबची आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर केला. या आंतरखंडीय फुटबॉल स्पर्धेत चीनच्या या फुटबॉल क्लबकडून अधिकृत परवानगी (लायसेन्स) साठी बरीच रक्कम बाकी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. चायनीज एफए चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानडाँग लुनेंग संघाने थायलंडच्या पोर्ट एफसी संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविले होते. या जेतेपदामुळे एएफसीच्या आशियाई चॅम्पियन्स लीग स्पर्धेत त्यांनी स्थान मिळविले होते.