ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
कोरोनाचे वाढत चाललेली रुग्ण संख्या लक्षात घेऊन गुजरातमध्ये पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. त्यानुसार 16 ते 28 फेब्रुवारी दरम्यान, अहमदाबाद, वडोदरा, सुरत आणि राजकोटमध्ये हा कर्फ्यू असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या वेळी नाईट कर्फ्यू एक तासाने कमी करण्यात आला आहे. त्यामुळे आता रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये मागील 24 तासात 247 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण संख्या 2,65,244 वर पोहोचली आहे. तर 4401 जणांनी आपला आतापर्यंत जीव गमावला आहे.