बेंगळूर पोलिसांची बेळगावात कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या एफडीए परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटली होती. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख संशयिताला बेंगळूर येथील सीसीबीच्या अधिकाऱयांनी बेळगावात अटक केली आहे.
शिवलिंग पाटील (वय 30, रा. नल्लानट्टी, ता. गोकाक) असे त्याचे नाव असून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तो फरारी झाला होता. शिवलिंग हा ज्ञानदीप कोचिंग सेंटर चालवत होता. अलिकडेच त्याने आपले कोचिंग सेंटरही बंद केले होते. 24 जानेवारी रोजी होणारी एफडीएची परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीमुळे रद्द केली होती.
शिवलिंग हा संगणकेरीमध्ये फर्निचरचे दुकान चालवत होता. याप्रकरणी सीसीबीच्या अधिकाऱयांनी अटक केलेल्या बहुतेक संशयितांनी शिवलिंग हाच प्रश्नपत्रिका फुटीचा प्रमुख सूत्रधार असल्याची कबुली दिली होती. सीसीबीचे प्रमुख संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अधिकाऱयांनी बेळगावातील शिवलिंगला अटक केली आहे.