लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश सरकारने अर्थसंकल्प सादर केला असून त्यात अयोध्येत रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदिराच्या निर्माणकार्यासाठी 300 कोटी रुपयांचा निधी निर्धारित करण्यात आला आहे. अर्थसंकल्प एकंदर 5 लाख 50 हजार 270 कोटी रुपयांचा असून तो विनाकागद पद्धतीने सादर करण्यात आला. हा राज्याच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे.
राममंदिर निर्माण कार्याला निधी देण्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीचा विकास आणि सौंदर्यीकरणासाठी 100 कोटी रूपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर अयोध्येतही पर्यटन विकासासाठी 100 कोटी रूपयांचा स्वतंत्र निधी देण्याचा प्रस्ताव यात आहे. याशिवाय चौरीचौरा शताब्दी कार्यक्रमासाठीही निधीचे प्रावधान करण्यात आले आहे.