वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या नव्या येणाऱया गाडीचे नाव नुकतेच घोषित केले आहे. प्रीमियम सुव्ह गटातील नव्या गाडीचे नाव ‘अल्काझार’ असे ठेवण्यात आले आहे. सदरच्या नव्या गाडीमध्ये सात जण बसतील अशी व्यवस्था आहे.
नव्या गटामध्ये प्रवेश करून कंपनीने आपले अस्तित्व या गटात अधिक गडद करण्याचा इरादा केला असल्याचे हय़ुंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एस. किम यांनी सांगितले. नव्या युगातील खरेदीदारांना आकर्षित करण्यात ही गाडी यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हय़ुंडाईने देशामध्ये ग्राहकांच्या अतुट विश्वासावर आपली यशस्वी 25 वर्षे पूर्ण केली आहेत. देशातील कारमध्ये पहिली स्मार्ट मोबिलिटी सोल्युशनची व्यवस्था करणारी ही गाडी असल्याचे कंपनीने म्हटले आहे.