इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ऍक्टिव्हीटी निर्देशांक 55.3 टक्क्यांवर
नवी दिल्ली
नवीन ऑर्डरमधील तेजीच्या वातावरणामुळे मागील महिन्यात सेवा क्षेत्रातील कंपन्यांचा व्यवसाय हा मागील एक वर्षाच्या पातळीवर वधारला आहे. परंतु रोजगारामध्ये घसरण झाल्याची माहिती आहे. सदरची माहिती ही एका मासिक सर्वेक्षणातून करण्यात आली आहे. ज्याच्या आधारे मागील महिन्यात कंपन्यांच्या एकूण खर्चामध्ये सर्वात वेगाने वाढ झाल्याची नोंद केली आहे.
जानेवारीमध्ये 52.8 वर राहिलेला हा टक्का इंडिया सर्व्हिसेस बिझनेस ऍक्टिव्हीटी इंडेक्स फेब्रुवारीत 55.3 टक्क्यांवर राहिला आहे. मागील एक वर्षाच्या दरम्यान समान महिन्याच्या कामगिरीत तेजीची उसळी राहिली होती. हा बदल होण्यामागे मागणीतील झालेल्या वाढीचा आणि बाजारातील बदलत्या संकेताचा प्रभाव असल्याची माहिती आहे.
इंडेक्स 50 पेक्षा वर जाण्यासाठी ऍक्टिव्हीटीमधील वाढीचा परिणाम आहे. जो फेबुवारीमध्ये सलग पाचव्या महिन्यात वाढत राहिला आहे.
कोरोना व प्रवासाचा प्रभाव
सर्वेक्षणामधील उपलब्ध माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये नवीन व्यवसायामध्ये गती राहिली आहे. जी मागील पाच महिन्यात वाढतीच राहिली आहे. परंतु कोरोना आणि प्रवासावर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे सेवा क्षेत्रातील मागणीवर दबाव राहिल्याने सर्व्हिस क्षेत्रात दबावाचे वातावरण कायम राहिले. यामध्ये फेब्रुवारीत नवीन एक्स्पोर्ट ऑर्डर सलग 12 व्या महिन्यात घटली आहे.
खासगी क्षेत्रात वाढ
फेब्रुवारीमध्ये खासगी क्षेत्रातील उत्पादन चार महिन्यात सर्वाधिक वाढले आहे. सर्वेक्षणानुसार सर्व्हिस क्षेत्रामधील ट्रान्सपोर्ट आणि स्टोरेज सेगमेंटची वाढ ही अतिशय वेगवान राहिली आहे.