ढाका
बांगलादेशामध्ये स्वातंत्र्याची पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने बायोशखी टीव्हीने बांगलादेशामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथीय न्यूज अँकरची नियुक्ती केली आहे. या अँकरचे नाव तश्नुवा आनन शिशिर असे असून तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. सदरचा निर्णय हा येत्या 8 मार्च रोजीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत घेतल्याचे बायोशखी टीव्हीने स्पष्ट केले आहे. द डेली स्टारच्या माहितीनुसार तश्नुवा आनन शिशिर याने 2007 रोजी थेटर मंडली नटुआसोबत आपल्या अभिनयातील करिअरला सुरुवात केली. यामध्ये दोन वर्षांपेक्षा अधिकचा अनुभव घेतला आहे. चालू वर्षात दोन चित्रपटातही तश्नुवा झळकणार आहे. आम्ही महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हा वेगळा निर्णय घेत एक आदर्श निर्माण करत असून असा बदल या आधीच्या काळात कधीही केला नसल्याचे डेली बायोशखी टीव्हीने स्पष्ट केले आहे.