हनुमान चषक 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
एमसीसीसी ऍकॅडमी आयोजित हनुमान चषक निमंत्रितांच्या 14 वर्षाखालील आंतरक्लब स्पर्धेत एमसीसीसी अ संघाने ब संघाचा 160 धावानी तर अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना संघाने एमसीसीसी ब संघाचा 9 गडय़ानी पराभव केला. मलिक मुल्ला (एमसीसीसी अ), शुभम खोत (अर्जुन स्पोर्ट्स) सामनावीर ठरले.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात एमसीसीसी अ संघाने 25 षटकात 8 बाद 219 धावा केल्या. मलिक मुल्लाने 4 चौकारासह 51, गणेश हुल्यापगोळने 34, मोहित सय्यदने 21, सचिन चव्हाणने 17 धावा केल्या. एमसीसीसी ब संघातर्फे झोया काझीने 23 धावात 3, प्रेम इंगळेने 32 धावात 2, सुफियान कित्तुरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल एमसीसीसी ब संघाचा डाव 18 षटकात सर्वबाद 59 धावात आटोपला. प्रणय बस्तवाडने 14 धावा केल्या. अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मोहित सय्यदने 3 धावात 2, मलिक मुल्लाने 5 धावात 2 तर मयांक पाटील, शादाब तांबले, झोया बालगीकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात एमसीसीसी ब संघाने 23.5 षटकात सर्वबाद 83 धावा केल्या. ओमकार चौगुलेने 8 धावात 3, शुभम खोतने 11 धावात 2, गौरव पाटील, अर्जुन प्रधान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल अर्जुन स्पोर्ट्स युनियन जिमखाना संघाने 10.1 षटकात 1 बाद 84 धावांसह सामना जिंकला. शुभम खोतने नाबाद 32, साईराज साळुंखेने नाबाद 23 धावा केल्या. अब्रार कादरीने 1 गडी बाद केला.