प्रत्येकासाठीच शाळेतले दिवस आणि आठवणी हा खजिना असतो. शालेय वय या विषयावर आजपर्यंत अनेक सिनेमे आले, पण पुन्हा एकदा शाळेत नेणारा सिनेमा लवकरच येणार आहे. काही महिन्यांपूर्वी ‘बॅक टू स्कूल’ या चित्रपटाची घोषणा केली होती. सोबतच या सिनेमाचे पोस्टर देखील प्रदर्शित केले होते. मात्र सिनेमातील कलाकार, सिनेमाची कथा, प्रदर्शनाची तारीख याबाबत कमालीची उत्सुकता ताणून ठेवली होती. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त सोहळा दिमाखात संपन्न झाला.
मुंबईत झालेल्या या सोहळ्याला कलाकारांसोबतच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले आणि विद्यमान आमदार महेशदादा लांडगे तसेच नगरसेविका सोनाली गव्हाणे उपस्थित होते. या सिनेमाची वैशिष्टय़े म्हणजे सोनाली गव्हाणे, मेघराज भोसले आणि महेश लांडगे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
सिनेमात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण -विश्वासराव, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱहाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी आणि ईशा आगरवाल आदी अनेक कलाकार या सिनेमात आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने निशिगंधा वाड या बऱयाच दिवसांनी मराठी चित्रपटात दिसणार आहेत. दिग्दर्शन सतिश महादु फुगे यांनी केले असून पटकथा आणि लेखन अमित नंदकुमार बेंद्रे आणि सतीश महादू फुगे यांचे आहे. शुभांगी फुगे आणि सतिश फुगे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहनिर्माता हनुमंत नाडेकर असून सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुदर्शन रणदिवे, अमित बेंद्रे, अमृता पाटील, प्राची फुगे, अमृत झांबरे, किरण झांबरे, दिपक गडदे यांनी काम पाहिले आहे. श्रीनिवास गायकवाड यांनी छायाचित्रण दिग्दर्शन केले आहे.
संकलन – अनुराधा कदम