डिचोलीत जोरदार पाऊस. साखळीत जोर कमी
डिचोली/प्रतिनिधी
वेधशाळेने दिलेल्या अंदाजाप्रमाणे काल रवि. दि. 11 एप्रिल रोजी संध्याकाळी डिचोली व साखळीत पावसाने उपस्थिती लावली. डिचोलीत सुमारे अर्धा तास जोरदार पावसाची वृष्टी झाली. त्यामुळे काही काळासाठी जनजिवन विस्कळीत झाले. सखळीतही पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र पावसाचा जोर तसा कमीच होता. मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
गेले दोन दिवस डिचोली साखळीत ढगाळ वातावरण असल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होताच. त्याचप्रमाणे ढगाळ वातावरणामुळे उकाडाही प्रचंड प्रमाणात वाढला होता. रविवारी संध्याकाळी अचानकपणे पावसाला सुरूवात झाली. साखळीत एका चालीवर दहा मिनिटेच पाऊस पडला. तर डिचोलीत जोरदार पाऊस सतत सुमारे अर्धातास कोसळला. त्यामुळे काही काळासाठी जनजिवन विस्कळीत झाले.
डिचोली साखळी शहरांबरोबरच अनेक ग्रामीण भागातील गावांमध्ये गडगडाटासहीत पावसाच्या सरी कोसळल्याची माहिती आहे. पावसापूर्वी सामानाची बेगमी करणाऱया लोकांची धांदल उडाली. तसेच पावसामुळे रस्त्यांवरील दुचाकींची वर्दळ काही काळ ठप्पच झाली होती. पावसामुळे संध्याकाळी तालुक्मयातील वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने असह्य उकाडय़ामुळे हैराण झालेल्या लोकांना थोडाफार दिलासा मिळाला.