30 ते 40 टक्के वाढ शक्य- व्हॅक्सीनमुळे फ्रीजची मागणी वाढणार
वृत्तसंस्था/ मुंबई
वॉशिंग मशीनसह होम अप्लायन्सेस क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱया गोदरेज अप्लायन्सेसला रेफ्रिजरेशनच्या व्यवसायामध्ये 30 ते 40 टक्के इतका विकास साधता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कंपनीला सध्याला 150 कोटी रुपयांच्या रेफ्रिजरेटरची ऑर्डर मिळाली आहे. रेफ्रिजरेशनच्या उत्पादनांमध्ये गोदरेजने आपला विस्तार मोठय़ा प्रमाणात केला आहे. यांच्याकडे असणाऱया अल्ट्रा लो टेंपरेचरच्या रेफ्रिजरेटरमध्ये (फ्रिज) वैद्यकीय औषधे व व्हॅक्सीन उणे 86 सेल्सीयस डिग्रीपर्यंतच्या तापमानात सुरक्षित ठेवता येतात. या अंतर्गत कंपनीला रेफ्रिजरेशनच्या उत्पादनांची 150 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. भारत सरकारकडून 12000 फ्रिजची मागणी कंपनीकडे नोंदवण्यात आली असून ज्यांची किंमत 95 कोटी रुपये इतकी होत असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी 55 टक्के इतकी ऑर्डरची पूर्तता कंपनीने केली असून येणाऱया काळात उर्वरीत मागणी पूर्ण केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय मंडळ आणि राज्य सरकारकडूनही फ्रिजकरता कंपनीला 55 कोटींची ऑर्डर प्राप्त झाली असल्याचे गोदरेजने सांगितले. रेफ्रिजरेशनच्या या व्यवसायामध्ये कंपनीला वार्षिक तत्वावर 30 ते 40 टक्के विकास साधता येणार आहे. सध्याला व्हॅक्सीन साठवणुकीची मागणी लक्षात घेता फ्रिजना मोठी मागणी होत आहे.
उत्पादनात वाढ करणार
वाढत्या मागणीची दखल घेऊन गोदरेज अप्लायन्सेसने वर्षाला आईस लाइन फ्रिजच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याचे ठरवले आहे. येणाऱया काळात 35000 इतक्मया आईस लाईन फ्रिजची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्याला कंपनीकडून व्हॅक्सीन साठवणुकीकरता लागणाऱया फ्रिजचा पुरवठा केला जात आहे.