पिछोला सरोवरात बोटिंगचा घेतला आनंद
लेकसिटी उदयपूर पर्यटकांसह आता बॉलिवूड कलाकारांचीही पसंत ठरत आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर उदयपूर येथे पोहोचली आहे. तेथे एका जाहिरातीचे चित्रिकरण करण्यासह उदयपूरच्या सरोवरांना न्याहाळत आहे. तसेच पिछोला सरोवरात नौकाविहाराचा आनंद जान्हवी घेत आहे. तर कधी सरोवराच्या काठावर छायाचित्रे काढत आहे.
जान्हवी अलिकडेच मालदीव येथे सुटी व्यतित करून सोमवारी रात्री उदयपूरमध्ये पोहोचली होती. उदयपूर येथील सरोवराच्या काठावर असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ती वास्तव्यास आहे. जान्हवीचा पहिला चित्रपट धडकचे चित्रिकरणही उदयपूरमध्येच झाले होते.
यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतही उदयपूर येथे आली होती. कंगनाने सोशल मीडियावर उदयपूरची काही छायाचित्रे प्रसारित केली होती. पिछोला सरोवर काठावर नौकाविहारासह श्रीनाथजी मंदिरात राजभोग झांकीचे दर्शनही तिने घेतले हेते.