नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हवाई दल प्रमुख एअर चिफ मार्शल आरकेएस भदौरिया सोमवारी फ्रान्सच्या दौऱयावर रवाना झाले. हवाई दलाशी संबंधित काही व्यवहार आणि कवायतींबाबत ते या दौऱयात विविध अधिकारी-मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. 19 एप्रिलपासून 23 एप्रिलपर्यंत त्यांचा हा दौरा निर्धारित करण्यात आला आहे. फ्रान्समधील सुरक्षा-लष्करी अधिकाऱयांची प्रत्यक्ष भेट घेऊन ते द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न करतील. तसेच फ्रान्समधील विविध हवाईतळांनाही ते भेट देणार आहेत. राफेल विमानांची निर्मिती करणाऱया दसॉल्ट एव्हिएशन कंपनीमध्ये जाऊनही ते संबंधितांशी चर्चा करून आढावा घेतील. भारताला एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत आणखी 6 विमाने प्राप्त होणार आहेत.