नवी दिल्ली
सिमेंट क्षेत्रात नावाजलेली कंपनी एसीसी लिमिटेडचा मार्च तिमाहीअखेर निव्वळ नफा 74 टक्के वाढून 563 कोटी रुपयांवर पोहचला आहे. ही वाढ मागच्या वर्षाच्या तुलनेत नोंदली गेली आहे. याचप्रमाणे कंपनीच्या महसुलातही 23 टक्के वाढ झाली असून तो 4 हजार 213 कोटी रुपयांवर पोहचला आहे. या तिमाहीत कंपनीने सर्वाधिक महसूल प्राप्त करण्यात यश मिळवलं आहे. येणाऱया काळात सिमेंटच्या वाढत्या मागणीवर कंपनीचे लक्ष असणार आहे. मागणीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजले जाणार आहेत.