प्रतिनिधी / बेळगाव
कणकुंबी तपास नाक्मयाजवळ अबकारी अधिकाऱयांनी 6 लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. या प्रकरणी बेळगाव येथील एका रहिवाशाला अटक करण्यात आली असून अधिकाऱयांनी सात लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त केला आहे.
बालकृष्ण अतिवाडकर (वय 47, रा. बेळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास कणकुंबी तपास नाक्मयाजवळ जीए 05 टी 0286 क्रमांकाची ट्रक अडवून तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये पार्टीशन करून बेकायदा दारू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. अधिकाऱयांनी 6 लाख रुपये किमतीचा 270 लीटर दारूसाठा जप्त केला. दारु वाहतुकीसाठी वापरलेला सात लाख रुपयांचा ट्रकही जप्त केला आहे. अबकारी अप्पर आयुक्त डॉ. एस. के. कुमार, उपायुक्त जयरामेगौडा, उपअधीक्षक आर. एम. मुरगोड, अबकारी निरीक्षक सरस्वती व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.