2018 मधील मतदार यादीचा घेणार आधार
प्रतिनिधी / बेळगाव
सध्या राज्यात कोरोना विषाणूचा फैलाव मोठय़ा प्रमाणात पसरला आहे. याचदरम्यान महापालिका वॉर्डस्तरीय मतदारयाद्या तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला बजावला आहे. त्यामुळे मतदारयाद्या तयार करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांचा आधार घेऊन नवीन मतदारयाद्या तयार करण्याच्यादृष्टीने महापालिकेने तयारी चालविली आहे.
महापालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून सात कर्मचाऱयांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात क्लोजडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे अनावश्यक व्यवसाय सुरू करणाऱयांवर कारवाई करण्यासाठी मनपाच्या कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशातच वॉर्ड पुनर्रचनेनुसार मतदारयाद्या तयार करून दि. 10 मेपर्यंत तात्कालिक याद्या प्रसिद्ध करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन अडचणीत आले आहे. मतदारयाद्या तयार करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशा विनंतीचे पत्र महापालिकेने जिल्हाधिकाऱयांना पाठविले आहे. पण ऐनवेळी निवडणूक आयोगाने मुदत देण्यास नाकारल्यास महापालिकेला दिलेल्या मुदतीमध्ये मतदारयाद्या तयार कराव्या लागणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांना विनंती पत्र पाठवून महापालिकेने मतदारयाद्या तयार करण्यास पाऊल उचलले आहे.
वॉर्ड पुनर्रचना 2018 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी मतदारयाद्याही तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, पुनर्रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा आरोप करून माजी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच याबाबतची सुनावणी न्यायालयात प्रलंबित
आहे.
राज्य शासनाने नव्या वॉर्डनुसार आरक्षण जाहीर केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याच्यादृष्टीने तयारी चालविली आहे. न्यायालयीन सुनावणी प्रलंबित असतानाच मतदारयाद्या तयार करण्याची सूचना केली असून केवळ 14 दिवसांचा अवधी दिला आहे.
नव्या वॉर्ड पुनर्रचनेनुसार मतदारयाद्या तयार करण्यासाठी चकबंदीची चाचपणी करावी लागणार आहे. त्यामुळे 2018 मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदारयादीचा आधार घेण्यात येणार आहे. मतदारयादी तयार करण्यासाठी महापालिकेने वेळ मागितला आहे.
जर निवडणूक आयोगाने वेळ देण्यास नाकारल्यास अडचण निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे यापूर्वी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीच्या आधारे नवीन मतदारयादी करण्याची सूचना महापालिका आयुक्तांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना केली आहे. त्यामुळे महसूल विभागाने 2018 च्या मतदारयाद्या ताब्यात घेऊन नवीन मतदारयादी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.