नवी दिल्ली
मेडीअसिस्ट हेल्थकेअर सर्व्हिसेज यांनी आपला आयपीओ भारतीय भांडवली बाजारात सादर करण्याचा विचार चालवला असून याकरीता परवानगीकरीता सेबीकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. आयपीओच्या माध्यमातून प्रवर्तक आणि शेअरधारकांकडून 2.08 कोटी समभागांच्या विक्रीची ऑफर ठेवली जाणार आहे. बेंगळूरमधील सदरची कंपनी ही आरोग्य तंत्रज्ञान आणि विमा व्यवसायात कार्यरत असणारी आहे. सामान्यांसाठी व सार्वजानिक आरोग्य योजनांच्या माध्यमातून आवश्यक ते लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी कंपनी प्रयत्न करते आहे.