तालुक्मयातील 531 जणांचा समावेश
बेळगाव ः कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरही रुग्ण वाढतच चालले आहेत. गुरुवारी जिल्हय़ात तब्बल 1448 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्मयातील 531 जणांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्हय़ामध्ये बेळगाव तालुक्मयातच सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत. शहरी भागात याचे प्रमाण अधिक असून ग्रामीण भागातही आता त्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
गुरुवारी शहरामध्ये 376 तर ग्रामीण भागात 155 रुग्ण आढळले आहेत. ही वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी आहे.
कारण रुग्णांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन आदी सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास याचा मोठा फटका बसण्याची भीती आरोग्य विभागातून व्यक्त होत आहे.
रुग्णांची संख्या वाढत असताना अजूनही कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. मास्क नसताना अनेक जण फिरताना दिसत आहेत. घरातून बाहेर पडताना तसेच घरातही आता मास्क घालावे असे आवाहन करण्यात आले. तरीदेखील याचा अनेक नागरिकांना विसर पडत आहे.
गुरुवारी बसवणकुडची, भडकल गल्ली, भाग्यनगर, चव्हाट गल्ली, चन्नम्मानगर, आदर्शनगर, अनगोळ, आनंदनगर-वडगाव, कणबर्गी, अंजनेयनगर, अशोकनगर, आझादनगर, बसव कॉलनी, क्लब रोड-बेळगाव, देवराज अर्स कॉलनी, द्वारकानगर, गांधीनगर, गोवावेस, गोंधळी गल्ली, गोडसेनगर, गोडसेवाडी, श्रीनगर, हनुमाननगर, हिंडाल्को कॉलनी, कुमारस्वामी लेआऊट, कुवेंपूनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, महांतेशनगर, महालक्ष्मीनगर, मल्लिकार्जुन गल्ली-खासबाग, मंगाईनगर-वडगाव, मारुती गल्ली-बेळगाव, हिंदवाडी, श्रीनगर, जाधवनगर, जयनगर, जनता कॉलनी-वंटमुरी, कडोलकर गल्ली, कोतवाल गल्ली, खडेबाजार-बेळगाव, कोनवाळ गल्ली, नानावाडी, नवहिंद कॉलनी-वडगाव, नेहरुनगर, न्यू गुड्सशेड रोड, ओल्ड गांधीनगर, पोलीस हेडक्वॉर्टर्स, टिळकवाडी, उज्ज्वलनगर, उद्यमबाग, वडगाव, वैभवनगर, विनायकनगर, पाईपलाईनरोड, रेल्वे स्टेशन रोड, रामतीर्थनगर, रुक्मिणीनगर, सदाशिवनगर, सह्यादीनगर, संभाजीनगर, शाहूनगर, शास्त्राrनगर, शिवबसवनगर, शिवाजीनगर यासह इतर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातील मुतगा, सांबरा-एटीएस, बी. के. कंग्राळी, बस्सापूर, कुकडोळी, बाळेकुंद्री खुर्द, बसरीकट्टी, बेळगुंदी, काकती, हिंडलगा, विजयनगर, रामनगर, सुळगा-हिंडलगा, हुदली, गणेशपूर, सांबरा, भेंडीगेरी, शिंदोळी, सुळेभावी, कडोली, वाघवडे, होनीहाळ, मुचंडी, के. के. कोप्प, अगसगे, कंग्राळी के. एच. या परिसरात रुग्ण आढळून आले आहेत.